Wednesday, January 24, 2018

#जास्वंद # Hibiscus#


 जास्वंदी ही बहुवर्षीय झुडुपवजा झाड आहे.जास्वंद ही अनेक रंगाची सुंदर फुले देणारी वनस्पती आहे.  जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसतो,   तरीही हे झाड बरेच  लोकप्रिय आहे. हे फुलझाड सहजपणे  अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते.गणपती अथर्वशीर्षांत वर्णन केलेले फुलाचे वर्णन जास्वंदाशी तंतोतंत जुळते. म्हणूनच कदाचित हे फूल गणपतीला वाहत असतील. जास्वंदाचे फुल गणपतीला अतिशय प्रिय आहे म्हणून भारतात ह्या फुलाला खास स्थान आहे.भारतात हजारो वर्षांपासून जास्वंदाचा अनेक पूजा विधींमध्ये, आयुर्वेद, रंगकाम अशा अनेक गोष्टींमध्ये वापर करण्यात येतो. जास्वंदाला इंग्रजीत shoe flower, chinese rose  असे म्हणतात. तर संस्कृतात त्याला ‘जपा’ असे नाव आहे. 
जास्वंद हे मलेशियाचे राष्ट्रीय फुल आहे ज्याची घोषणा १९६०मध्ये झाली. तसेच जास्वंद साउथ 

कोरिया आणि हैटी य देशांचे सुद्धा राष्ट्रीय फुल आहे.

 काही प्रजातीच्या जास्वंदाचा उपयोग नैसर्गिक रंग स्त्रोत म्हणून होतो. जास्वंदीची फुले नजरेत 
भरणाऱ्या अनेक रंगामध्ये उपलब्ध आहेत. सफेद, लाल, पिवळा, केशरी,नारिंगी, गुलाबी किंवा 
हायब्रीड जांभळी तसेच मिश्र फुले सर्वत्र दिसतात. फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. परंतु  हे 
फूल फार काळ टिकु शकत  नाही. सकाळी उमलणारे  हे फूल संध्याकाळी मलूल होऊन जाते. 

उपयोग:
जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस सौन्दर्य वाढवण्यासाठी होतो. जास्वंदीचे रस घातलेले केशतेल 
जपाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या 
अर्काचा समावेश होतो.जास्वंदाचे फुल, पाने, मुळे सर्वच औषधी आहेत.जास्वंदाच्या फुलांपासून 
तयार केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व केसगळती थांबविण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या 
तेलामुळे डोके थंड होते आणि उत्तम झोप येते.

जास्वंदाचा चहा म्हणून उपयोग केला जातो ज्यामध्ये विटामिन क अधिक प्रमाणात असते. 
तसेच ब्लडप्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

जास्वंदीच्या फुलांची व पानांची पेस्ट शाम्पू म्हणून वापरली जाते. पानांची पेस्ट गरम करून 
फोडांवर किंवा जखमेवर लावली जाते.

इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य 
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य 
रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क 
भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी 
किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात 
बाहेर पडतो. मेक्‍सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार 
केला जातो.

जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ 
लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या 
रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं. 
या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे 
शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते 
आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात 
राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे, 
त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या 
फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल 
संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे 
फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये.. 
शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता 
हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते अॅन्टि-ऑक्‍सिडन्ट म्हणून उत्तम कार्य 
करते.जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म 
असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो. 

जास्वंद हे फुल विविध रंगात आणि आकारात आढळते. ह्या झाडाला वर्षभर फुले येत असतात.
जास्वंदीच्या फुलाला बहुधा पाच पाने असतात आणि त्याचा व्यास सुमारे १० सेमी असतो. काही 
प्रकारच्या जास्वंदीमध्ये पाकळ्या दुप्पट आणि एकावर एक असतात.

जास्वंदाच्या फुलाचा औषधात वापर केला जातो. केस गळणे बंद व्हावे यासाठी हे फूल अत्यंत गुणकारी असून, अनेक प्रकारच्या तेलांमध्ये याचा वापर केला जातो. जास्वंदाच्या पाकळ्या मांसल असतात. काही भागात सलाड म्हणून त्या खाल्ल्या जातात. या पाकळ्यांचा चहादेखील केला जातो. जास्वंदाचा चहा अत्यंत गुणकारी आहे. त्वचा रोग, केसांचे आरोग्य, तारुण्य टिकवण्यासाठी, रोगप्रतिकारक  क्षमता वाढविण्यासाठी, श्वसनाचे विकार या सगळ्यांत जास्वंदाचे फूल औषध म्हणून वापरले जाते. जास्वंदाच्या पाकळ्या सावलीत  वाळवून त्यावरून नैसर्गिक निळा रंग तयार केला जातो. हजारो वर्षांपूर्वी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांमध्ये काढलेली चित्रे रंगवण्यासाठी याच जास्वंदाच्या फुलांपासून बनविलेला रंग वापरला गेलाय, तो अजूनही तितकाच ताजा वाटतो. अनेक पुरातन मंदिरे, महाल, राजवाडे यांमधील कलाकुसरीत जास्वंदाच्या फुलाचा रंग वापरला गेला आहे. याच फुलांचा रस काढून त्यात साधा सफेद कागदाचा तुकडा बुडवून वाळवला की झाला आपला  ढऌ पेपर तयार! तो तुम्ही आम्लातीत बुडवला तर हिरवा आणि आम्लात  बुडवला तर गडद गुलाबी होतो. याच्या गडद रंगामुळे आणि सुंदर रचनेमुळे या झाडांची मंदिरात, शाळा परिसर, उद्यानात शोभेची वनस्पती म्हणून लागवड होते. जास्वंदाला वर्षभर फुले येतात. या फुलांना सुगंध नसतो.

जास्वंदाची पाने गडद हिरव्या रंगाची असून पसरट असतात. पानांचा आकार वेगवेगळा असतो. पानांची कडा दातेरी असते. ही पानेदेखील औषधी असतात. केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी वापरली जातात. तसेच पानांचा रस आणि काढा हा अनेक व्याधींवर गुणकारी मानला जातो.
जास्वंदाच्या झाडाची साल आणि मुळेदेखील औषधात वापरली जातात. मधुमेह नियंत्रणात जास्वंदाच्या फुलांच्या वापरावर संशोधन चालू असून त्याचे निकाल सकारात्मक आहेत.
जास्वंदाच्या झाडाला फळे येत नाहीत. फळे नाही त्यामुळे बिया नाहीत. फांद्यांपासून नवीन रोपे तयार करता येतात. जास्वंद अगदी कमी पाण्यात वाढते. गावाकडे घराभोवती तसेच शेताला कुंपण करण्यासाठी याचा वापर केला जातो. अतिशय औषधी असणारी, गणपतीला प्रिय असणारी जास्वंद वनस्पती आपल्या हरित धनात नसेल तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. आपण कुंडीमध्येदेखील याची लागवड करू शकतो.

केसगळतीवर गुणकारी जास्वंद
जाणून घ्या केसगळतीवर किफायतशीर असलेल्या जास्वंदाचे , कसे बनवाल घरच्या घरी हेअर पॅक्स....

जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे.फॉसफरस , कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती , अकाली केस पांढरे होणे , केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो. 
  • केसगळतीवर परिणामकारी जास्वंद –
    – जास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत.
    – जास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात
    – जास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन सी मुळे केसांची घट्ट होतात

    घरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक
    • जास्वंद आणि खोबरेल तेल 
    काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा
    थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .
    • जास्वंद आणि ऑलिव तेल
    जास्वंदाचा वापर तुम्ही रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा तुमचा शाम्पू तयार ! खलबत्यात २-३ जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण १५-२० मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.
    • जास्वंद आणि आवळा
    जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका . ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.
    संबंधित दुवे-संकलित 




















Thursday, September 7, 2017

#"VASTU SHASTRA#

#"VASTU SHASTRA#

# The Science To A Happy And Healthy Home#


#Vastu Shastra may not be essential for living, but it is helpful for a better and healthier life. It's a proven and well-observed science of environment where you live in. The energy generating in the environment you live will define the energy you build in you and your mind, which manipulates the forces of natures to work in favour of us. These Sciences make the GOOD times BETTER and BAD times EASIER.  Vastu correction is possible through remedies without demolition.

डाऊझिंग

# प्रश्न तुमचा  उत्तर  डाऊझिंगचे 

डाऊझिंग शास्त्रा चा उपयोग ---आरोग्य, यश आणि समृध्दीसाठी  
कौटुंबिक,आर्थिक ,  सामाजिक, व्यावसायिक, सप्तचक्र, कलर थेरेपी , रत्न थेरेपी,   
शैक्षणिक- बौद्धिक क्षमता तपासणी (multiple intelligence),  जीवनातील नकारात्मक उर्जा मुळे निर्माण झालेली परिस्थिती शोधून त्यावर सकारात्मक उपाय योजना,

हल्ली धावपळी च्या जीवना मध्ये अनेक रोग  किवा आरोग्य विषयक  बरेच प्रश्न असतात :


पण मह्त्वा च्या अनेक कारण मध्ये एक  ' Geopathic Stress" किंवा वास्तू आणि भूमीतील गुण दोष , एक अदृश्य निगेटिव earth energy असू शकते . 


बहुतांश वेळा cancer , heart blockages, संधिवात,  मधुमेह, infertility, गर्भपात, फिट्स , abnormalities , स्वभावातील चिडचिडे पणा , allergy, हार्मोनल प्रोब्लेम्स, Depression, abnormal  behaviour , restlessness  etc., Geopathic Stress" किंवा वास्तू आणि भूमीतील गुण दोष शरीरातील प्रतिकार शक्ती कमी करते त्यावेळी bacterial , viral, fungal infection attack करतात, त्यामुळे विविध अवयवांची कार्यशक्ती व कार्यक्षमता मंदावते 

Geopathic Stress अत्याधुनिक instrument ने डीटेक्ट करून उपाय योजना करू शकतो.डाऊझिंग शास्त्रा चा उपयोग ---आरोग्य, यश आणि समृध्दीसाठी  
कौटुंबिक,आर्थिक ,  सामाजिक, व्यावसायिक, सप्तचक्र, कलर थेरेपी , रत्न थेरेपी,   
शैक्षणिक- multiple intelligence,  जीवनातील नकारात्मक उर्जा मुळे निर्माण झालेली परिस्थिती शोधून त्यावर सकारात्मक उपाय योजना करू शकतो. 
अशा अनेक विषयावर अचूक उत्तर शोधणे म्हणजेच डाऊझिंग,

Tuesday, July 9, 2013

Karwar -Beauty of nature


अचानक एक दिवस भावोजींचा फोन आला, म्हणाले की शैला म्हणते तू काहीतरी लिहावं, आपल्या कारवार विषयी. 

त्या क्षणापासून मी कारवार बद्दल विचार करत राहिली. बाल कवीच्या कवितेतल्या ओळी माझ्या मनात रुंजी घालत होते.

"  ऎल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन
निळासांवळा झरा वाहतो बेटाबेटातुन.
चार घरांचे गांव चिमुकले पैल टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे.
पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे.
झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर"

आपल गाव म्हटलं की आजही माझे मन वाऱ्याच्या गतीने जावून कारवारला विसावते.
ज्या कारवार मध्ये माझे पुरा बालपण शिक्षण होईतोपर्यंत गेले. तेंव्हा जेवढी आपुलकी नव्हती अस नव्हे जाणीव नव्हती मला. आज प्रत्येक आठवणी मध्ये मी दंग होवून जाते.

आपल कारवार काही पर्यटनस्थळां पैकी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ , जिथे  आपल्या ग्रामीणपणाबरोबर सुसंस्कृतपणाही छानच जपलाय. या अनोख्या गावाला निसर्गाची साथ आहेच , जोडीला अफाट निळयासार अरबी समुद्राची गाज, समुद्रामध्ये देवगड, मडलिंग गड, आणि कुरुम गड जिथे दरवर्षी नरसिंह देवाची विशेष जत्रा भरते. नयनरम्य निसर्ग बहाल करताना विधात्याने कुठेच हात आखडता घेतलेला नाही ह्याच मला अप्रूप  वाटते.  महत्त्वाचं बंदर अशी ओळख असलेलं कारवार ‘काळी’ नदीच्या मुखापाशी वसलं आहे. संथ वाहणाऱ्या काळी नदीची चमचम करणाऱ्या सूर्याच्या  किरने व त्यामध्ये दिसणाऱ्या सोनेरी व  चंदेरी लाटा आणि अफाट अरबी समुद्राच्या फेसाळ लेल्या लाटा ज्या मध्ये सगळेच हरखून जातात.  समुद्र आणि नदीच्या संगमावर्ती जो पूल आहे तो तर मला नेहमी लंकेच्या सेतू सारखा वाटत असतो. ज्याच्यावर उभे राहून माझ्यासारखे कित्येकजण  क्षितीज्याच्या त्या पलीकडे अस्तःला जाणारा सूर्य डोळ्यात साठवतात. तिथूनच खाली माझ्या मामाच गाव तारीवाडा वसलेलं आहे काळी नदीच्या तीरावर.घराच्या अंगणातून उगवता सूर्याला न्याहाळणे व सखल वाडा वरच्या रेतीच्या ढिगाऱ्या वर बसून मावळतीचा सूर्य पाहणे हा तर माझा बालपणीचा छंदच बनला होता जणू. 

इथल्या सदाशिव गडावर सावरपै वरती ऐतिहासिक कोठा-खली आहे, वर गडावर किल्ला आहे, जिथे आजही ऐतिहासिक तोफा आपण पाहू शकतो. गडावर आपल्या भंडारी लोकांच सुंदर मनोहारी दुर्गा माता मंदिर आहे जिथे दशहरा उत्सव मोठ्या पारंपारिक पद्धतीने व धुमधडाक्यात साजरा केला जातो. , जिथले पायऱ्या चढ उतार करणे आम्हा मैत्रिणीचा शाळेतून येतानाचा रोजचा आणि एक छंद. जवळचा ‘पीरशहा शमसुद्दिन खारोबात’चा दर्गा व तिथला उरूस, आणि महामाया मंदिर चा प्रसिद्ध तेर, मनाच्या आठवणीत नेहमी असतात. 

माझ्या सासरच नागनाथ मंदिर जे नंदनगदडला काळ्या नदीच्या काठावर आहे जिथे हि कित्येक पर्यटक नेहमी भेट देतात. दिवसभरात निसर्गाची वेगवेगळी रूपं दाखवणा-या कारवार शहराची चौपाटी म्हणजे ‘रवीन्द्रनाथ टागोर बीच’. याखेरीज बेलेकिरी, अंकोला, गुरुचारीत्रातल पवित्र स्थान गोकर्ण- महाबळेश्वर, तिथल ओम बीच हे कारवारी किनाऱ्यांचे वैभव अधिकच देखणे करतात. सागराची निळाई आणि दुर्मीळ पांढरी शुभ्र वाळू हे या चौपाटीचं वैशिष्टय़ आहेच तर तील माती वरची काळे तिळा सारखी माती हे एक बघण्यासारखे वैशिष्ठ.कारवार जवळच्या ‘बेतकोल’ या धक्क्यावर बारमाही मासेमारी चालते. बांगडा’मासा म्हटला आणि कारवारच नाव आठवत नाही असा कारवारी माणूस दुजाच.कारवारच्या समुद्रातील ‘बांगडा’ आणि तर्ली त्याच ‘हुमण’ (कालवण) जेवणात मिळाल्यावर मत्स्यप्रेमीना जो आनंद तो विरळाच. 

निसर्गप्रेमी बेंगाली कवि रवींद्रनाथ टागोर हे तर कारवारच्या सागरकिनाऱ्याच्या प्रेमातच पडले.कारवार ला १८८२ त्याच्या वयाच्या २२ व्या वर्षी भेट दिली होतीत्यांचे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे  ब्रिटिश आमदानीत कारवारला बडे सरकारी अंमलदार होते. तेव्हा रवीन्द्रनाथांचं कारवारला नेहमीच येणं होई. या किनाऱ्याबद्दल गुरुदेव म्हणतात,
कारवारचा समुद्रकिनारा ही खरोखरच अशी उत्तम जागा आहे की, या ठिकाणी आपल्याला जाणीव होते की निसर्गाचे सौंदर्य हे एखादे काल्पनिक मृगजळ नाही तर ते अनंत्वाचा आनंद प्रतिबिंबित करणारे आहे आणि त्यायोगे आपल्याला त्यात हरवून जायला लावणारे आहे.’’ या सागर किना-याला कविवर्य रवींद्रनाथ टागोरांचे नाव देऊन मोठे औचित्य साधले गेले आहे. 

कारवार नजीकच्या विलोभनीय ‘देवबाग’जिथले नरसिंह देव् स्थान ,व डौलदार सुरीच्या झाडातली धुंद -बेधुंध सलसलती हवा,तिथला निळाशार समुद्र सफेद वाळूचा किनारा चालत अनुभवणे. मध्येच काळ्या नदीच छोठ छोठ नैसर्गिक बहारदार अस्तित्व दाखवणे मनाच्या आठवणीत सदा असतात.  बस ने किंवा तिकडे पोहोचण्यासाठी समुद्रातूनच 10 मिनिटांचा लाँचप्रवास करून  निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटक इथे जातात, ते ठिकाण त्यांना खचितच आवडते. वनपर्यटनाचा सुखद अनुभव देणारी ‘लॉगहट’ निवास व्यवस्थेसह स्वयंपूर्ण सुसज्ज निवासव्यवस्था येथे उपलब्ध आहे. त्याशिवाय सागरी नौकानयन, जलक्रीडा आणि जंगल सहवासातील पदभ्रणाला (ट्रेकिंग) येथे खूपच वाव आहे.

कारवारला नैसर्गिक पार्श्वभूमीबरोबर धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इतिहासकाळात कारवार ही एक प्रमुख व्यापारी पेठ आणि विजापूर प्रशासनाच्या अधिपत्त्याखालील देसायांचं ठाणं होतं. बंदराचं महत्त्व जाणून सन 1638 मध्ये इंग्रजांनी व्यापार वृद्धीसाठी कारवार मुक्कामी वखार थाटली. इथून मसाल्याचे पदार्थ आणि कापडाची निर्यात  होत असे. पोतुगीज आणि डचांनीसुद्धा कारवारहून व्यापाराला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन वेळा कारवारवर स्वारी करून स्वराज्यविस्ताराचा प्रयत्न केला. सन 1715 मध्ये सोंडेकर संस्थानिकांनी जुना किल्ला पाडून आजचा ‘सदाशिव गड’ उभारला. मुंबई - कोचीन दरम्यानचं एक सुरक्षित बंदर म्हणून कारवारचं महत्त्व पहिल्यापासून आहेच.कारवारवर कोकण - गोवा यांच्याप्रमाणे मराठी छाप आहेच. अनेक मराठीभाषक कुटुंबांची देवस्थानं आणि श्रद्धास्थान असलेली येथील बरीच मंदिरं जुन्या शैलीची असून त्यातून पुरातन शिल्पकला आणि जीवनशैली जाणवते. कारवारजवळील महासती मंदिर (मस्ती कट्टा) आणि संकेरीच्या कृष्ण मंदिरांतून प्राचीन शैलीचे आविष्कार पाहायला मिळतात. सर्व थरातील पर्यटकांना परवडणारी खासगी हॉटेल निवासव्यवस्था कारवारला आहे. तसेच येथील कोकणी पद्धतीचे शाकाहारी - मांसाहारी भोजन सर्वाना समाधान देणारे आहे. एकांतप्रिय - निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी कारवार परिसर परिपूर्ण आहे. पर्यटनाला आमंत्रण देऊन कारवारचा परिसर नेहमीच आपलं स्वागत करते.

पूर्वीच्या काळी रस्त्यांची अवस्था अंत्यत बिकट होती. अनेक रस्ते कच्चे होते. एसटीचा प्रसार फारसा झालेला नव्हता. दळणवळण हे बरेचसे बैलगाडीने तर काही ठिकाणी पायी मैलोन मैल चालत जावे लागत असे.  आज सर्व गावे रस्त्याने जोडली गेलेली आहेत. सर्वत्र एसटीचा संचार आहे. जोडीला खासगी वाहने, रेल्वे ह्यामुळे प्रवास  सोपा झाला आहे. पूर्वी स्वत:च्या मालकीची सायकल असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. काळाच्या ओघात सायकल बंद झाली असून, तिची जागा आता मोटारसायकल व काही ठिकाणी चारचाकी वाहनांनी घेतली आहे. अनेकांकडे स्वत:ची वाहने आली आहेत.  

पूर्वीच्या काळी दळणवळणाची समस्या असताना आपले कितीतरी पूर्वज बांधव मुंबई ला किती दिवसाचा नव्हे तर किती महिन्याचा चालत प्रवास करून मुंबईला कामासाठी आले होते. त्यातच एक माझे चुलत आजोबा काशिनाथ कलगुटकर. त्यातल्याच काही जणांनी रोजच्या जगण्याच्या धावपळीत कारवार जिल्हा भंडारी संघाची स्थापना केली होती. ज्याचा आजच्या आपल्या पिढीमध्ये वटवृक्ष झालाय. कित्येकांच्यी मेहनत, कष्ठ  , प्रयत्न ह्यांचे आपण आभार मानायला पाहिजेत. जे  आपल्या रोजच्या धावपळीत आपल्या समाजासाठी झटतात. त्यांना आपणहि साथ ध्यायला पाहिजे. 

काही काही माणसे  नुसते  विचारतात ह्या कारवारी भंडारी समाज संघाने  समाजासाठी काय केले? असं हे जे विचारतात त्यांना ह्या संघाकडून काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः हि तो एक माणूस म्हणून कसा झटतो किंवा कसा झटला असता संघासाठी. संघ म्हणजे कोणा एकाचा नाही आहे, तो आपल्या सर्वांचा आहे, त्याला मोठ करणा आपल्या सर्वांच एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे , पुढच्या पिढी  साठी त्याचा विस्तार करणे जरुरी आहे.  नाही ना? एक वास्तू उभी राहिली नाही आपल्या समाज्याची ह्यांची खंत सगळ्यांना आहे पण .........................पुढे कितीतरी पण ची उत्तर आपल्याकडे नाही आहेत. ज्या माणसाने संघ स्थापन केला १९४५ साली त्याकाळी अपूर शिक्षण, अपुरा पगार, जगण्याची धडपड त्यात जे स्वतः आपल्यासाठी आणि आपल्यापारीवारासाठी कमी पडत असणार तेंव्हा ते कुठून एवढा निधी जमा करून आपल्यासाठी आरामात वास्तू उभे करणार. ही आपली  अपेकश्या फोल आहे. आपण १९४५ पेक्ष्या आज २०१० साली खूप काही पुढे आहोत . मी जेव्हा १९९० साली मुंबईला प्रथम आली तेंव्हा आपला संघ आहे हेही मला माहित नव्हते, नंतर ब-रयाच कार्य कर्त्याने मेहनतीने आणि जिद्दीने २००२ पासून प्रयत्न करून नव्या जोमाने, नव्या उमेदीने  दरवर्षी विविध कार्यक्रम जसे स्नेह्सम्मेलन,वधु-वर मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम,गरजवंताना मदत  सुरु केले. ज्याच्यामुळे आपल्या सारख्या सगळ्या भंडारी बांधवाना त्याची महती समजली. आजची आपली पिढी मनात आणले तर काही करू शकते. त्यासाठी प्रत्येक भंडारी माणसाची ईश्च्या शक्ती पाहिजे. सगळ्याचे हात एकत्र एवूनच हे स्वप्न सत्यात आपण उतरवू शकतो. प्रत्येकाचा उदार दृष्टीकोन, प्रत्येकाची मदतीने आपण आपल्या समाज्यासाठी  काही करू 

आज आपण दरवर्षी संघाच्या स्नेह संमेलनामुळे भेटतो. कित्येक नव्या ओळखी होतात.किती जुनी ओळखीचे, आप्त स्नेही, मित्र , सखे, सोयरे भेटतात. आपण सगळे ह्या एका दिवसाची  वाट बघत असतो. त्यात एक धागा सम असतो तो आपण सगळे भंडारी कारवारचे आहेत.

आज आपण दरवर्षी संघाच्या स्नेह संमेलनामुळे भेटतो. कित्येक नव्या ओळखी होतात.किती जुनी ओळखीचे, आप्त स्नेही, मित्र , सखे, सोयरे भेटतात. आपण सगळे ह्या एका दिवसाची  वाट बघत असतो. त्यात एक धागा सम असतो तो आपण सगळे भंडारी कारवारचे आहेत.

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे